जागतील केव्हा
जागली ही अंतरे जागल्या चहु दिशा जागतील केव्हा वेड्या मनातील आशा
झोपल्या मनसोक्त त्या पांघरूण मी घातले अपयशाच्या आक्रोशाने आतातरी जागतील का ??
स्वप्न त्यांची असतील वेडी वेड्या माझ्या भावना आशेला जागवताना मन माझे झोपेल का ??
मनात माझ्या घर त्यांचे विश्वही माझ्या मनात मनात राहण्याच्या आशेने तरी आशा माझ्या जागतील का??