top of page

पहिल प्रेम : प्रेमाबद्दल अनोख्या पद्धतीने बोलणारे पुस्तक

While searching for some feel-good books, I came across this beautiful novella “Pahile Prem” by V.S. Khandekar and I am so glad I read it. I have missed reading Marathi books. Reading in your own language somehow makes things sound even more beautiful, especially the topics like this book addresses - The first love. Never have I ever read such a lyrical and yet so simple & precise description of love.


This book starts with a lawyer Devdutt Joshi who finds out that his college girlfriend, his first lover, is getting married. This makes him sad because she rejected his proposal during those days because she did not want to get married and now she was marrying a drawing teacher. On the same day, his mentor visits him and realises that something is off with Devdutt. After confessing why he is upset, the mentor tells him the story of his first love. Moving ahead, we follow Devdutt on his journey as he comes across different people may be due to his profession or family matters and knows about their first loves, unintentionally.



The language, symbolism and metaphors in this book have my heart. I have highlighted so many parts and a lot of lines warmed my heart. It is definitely worth reading. A classic for a reason.


खांडेकरांनी लिहलेले पहिले प्रेम पुस्तक मी सहजच वाचायला घेतले. सहजच नाही म्हणा. काहीतरी हलक फुलक वाचावं म्हणून पुस्तक शोधताना हे पुस्तक मला सापडले. पुस्तकाचे मुखपृष्ठ, लेखक आणि शीर्षक या तिन्ही गोष्टींनी मला आकर्षून घेतले.


पहिल्या प्रेमाबद्दल बोलावे तितके कमीच. प्रत्येकाचा वेगळा अनुभव, वेगळी व्याख्या, वेगळे वळण... तस पाहता सगळंच वेगळं. एवढं सगळं वेगळं असूनही बऱ्याच गोष्टी सारख्या राहतात आणि आपण याविषयी बोलतही नाही. ज्याप्रकारे पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीच्या पहिल्या प्रेमाला लिहलय, मला नाही वाटत याआधी मी अस काही वाचल आहे. अतिशय साध्या पण लयदार भाषेत लिहलेले हे पुस्तक नक्कीच मला भावले.


कथेतील व्यक्तिमत्वांना कस जुळवून आणता येईल आणि कसा कथेला सारून शेवट व्हावा याचे हे पुस्तक एक छान उदाहरण आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तकात वापरलेले रूपक, फारच छान. आजकालच्या सिनेमातील पाहिलं प्रेम मला फार कंटाळवाणं वाटत पण या पुस्तकातील प्रेमाच्या वर्णनाने मन एकदम खुश झालंय बघा.वाचकाला मंत्रमुग्ध करतील शब्दांचा प्रयोग खांडेकरांनी केला आहे.


नक्की वाचा.



bottom of page